महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चार हजारांची लाच मागणारा पोलीस एसीबीच्या जाळ्यात - लाच मागणी लातूर

किनगाव पोलीस ठाण्यात दाखल एका तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक धोंडीराम निवृत्ती सोनहिरवे यांनी 4 हजारांची लाच मागितली. मात्र, नंतर ही रक्कम घेण्यास त्यांनी टाळले. मात्र, लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने एसीबीच्या पथकाने त्यांना अटक केली आहे.

police-demand-of-bribe-in-latur
4 हजारांची लाच मागणारा पोलीस एसीबीच्या जाळ्यात...

By

Published : Mar 10, 2020, 4:40 PM IST

लातूर - तालुक्‍यातील किनगाव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकांनी एका व्यक्तीकडे चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, याची माहिती मिळताच एसीबीच्या पथकाने त्यांना अटक केली आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसानेच लाचेची मागणी केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

4 हजारांची लाच मागणारा पोलीस एसीबीच्या जाळ्यात...

हेही वाचा-जगभरात कोरोनामुळे ४ हजार जणांचा मृत्यू; चीनबाहेर २८ हजार नागरिकांना लागण

किनगाव पोलीस ठाण्यात दाखल एका तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक धोंडीराम निवृत्ती सोनहिरवे (वय ५७) यांनी 4 हजारांची लाच मागितली. मात्र, नंतर ही रक्कम घेण्यास त्यांनी टाळले. मात्र, लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने एसीबीच्या पथकाने त्यांना अटक केली आहे. ज्या पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावले त्याच ठाण्यात सोनहिवरे यांना अटक करण्यात आली आहे. लाचलूचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक माणिक बेंद्रे, बाबासाहेब काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details