लातूर- भाजपमधील अंतर्गत मतभेद उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीही कायम राहिले. भाजपकडून अभिमन्यू पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर, त्यांना विरोध करणाऱ्या येथील 3 भूमिपुत्रांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे औसा येथील रंगत वाढली असून आता ऐनवेळी कोण माघार घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - खडसे, बावनकुळे अन् तावडेंच्या उमेदवारीवर मुख्यमंत्री म्हणाले...
औसा येथे भाजपच्यावतीने अभिमन्यू पवार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भर पावसात उमेदवारी अर्ज दाखल केला. अभिमन्यू पवार यांची उमेदवारी दाखल करताना रॅलीवेळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. याच पावसात भाजप, सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. यावेळी उमेदवार अभिमन्यू पवार, सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, माजी खासदार सुनिल गायकवाड यांच्यासह अन्य नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅली तहसील कार्यालय परिसरात येताच पावसाला सुरुवात झाली. मात्र, भर पावसात कार्यकर्त्यांचा उत्साह शिघेला पोहचला होता.