लातूर - कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी 8 नवे आढळून आल्यानंतर बुधवारी 6 रुग्णांची भर पडली आहे. तर एकाच दिवशी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लातूरकरांची चिंता वाढली आहे.
लातुरात 6 नवे कोरोना रुग्ण; एकाच दिवशी दोघांचा मृत्यू - Corona Virus
लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत 56 जणांचे अहवाल तपासणीसाठी दाखल झाले होते. यापैकी 41 अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत 56 जणांचे अहवाल तपासणीसाठी दाखल झाले होते. यापैकी 41 अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 7 जणांचे अहवाल हे प्रलंबित आहेत. यामध्ये लातूर, उदगीर आणि औसा तालुक्यातील प्रत्येकी व्यक्तींचा समावेश आहे.
औसा येथील कादरी नगर भागातील रुग्णाला भूक लागत नव्हती तर त्यास किडनीचा, उच्च रक्तदाबाचा त्रास आणि मधुमेह होता. शिवाय दोन वेळा डायलिसिस करण्यात आले होते. त्याचा उपचारादरम्यान बुधावरी पहाटे मृत्यू झाला आहे. तर लातूर शहरातील मोतीनगर भागातील रुग्णाला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते ऑक्सिजन सपोर्टवर होते. तर 4 जूनपासून ते व्हेंटिलेटरवर होते. बुधवारी सायंकाळी 5 च्या दरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गत आठवड्यात नव्या रुग्णांची संख्या घटली होती. मात्र, दोन दिवसांपासून रुग्णाची संख्या वाढत असून जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.