महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औराद शाहजनीमध्ये 50 डुकरे मृतावस्थेत; दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

गेल्या १५ दिवसांपासून औराद येथे साधारण 50 च्यावर डुकरे मृत पावली आहेत. या मेलेल्या डुकरांना उचलण्याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यातच डेंग्यूची साथ वाढत असून बंदोबस्ताकडे मात्र, ग्रामपंचायत डोळेझाक करत आहे.

By

Published : Oct 31, 2019, 11:04 AM IST

औराद शाहजनीमध्ये 50 डुकरे मृतावस्थेत

लातूर - निलंगा तालुक्यातील औराद शाहजनीमध्ये तब्बल 50 च्यावर डुकरे मृत पावली आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरात दुर्गंधी पसरली असून त्याचा नागिरकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. यातच डेंग्यूची साथ वाढत असून बंदोबस्ताकडे मात्र, ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे.

औराद शाहजनीमध्ये 50 डुकरे मृतावस्थेत

ही मेलेली डुकरे उचलण्याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील मुख्य बाजापेठेत, बस स्थानकामध्ये आणि जवळपासच्या परिसरात, गणेश नगर, मारवाड गल्ली, मठाचा रोड, डी एड कॉलेजच्या मुख्य रस्त्यावर डुकरे मरून पडली आहेत. मात्र, यावर गावातील नेते, सत्ताधारी, विरोधक मंडळी कुणीही चर्चा करायला तयार नाहीत. तर, ग्रामपंचायतही काही हालचाल करायला तयार नाही.

हेही वाचा -लातूरच्या माकणीत वीज कोसळून महिलेचा मृत्यू

या विरोधात मंगळवारी काही नागरिकांनी सोशल मीडियावर आंदोलन छेडले होते. त्यानंतर, प्रशासनाने 15 ते 20 मृत डुकरांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेपलीकडे जमखंडी रोडवर टाकले. तर, 7 ते 8 डुकरांना औराद बस स्थानकाजवळ खड्डा काढून पुरले. मात्र, डुकरांच्या मृत्यूने परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा हैदोस वाढल्याने डेग्यूंची साथही आली आहे. नुकतेच येथील गणेश नगरमध्ये डेंग्यूच्या आजाराने एक मुलगी दगावली होती. तर, 10 पेक्षा अधिक रुग्णांवर लातूर येथे उपचार सुरू आहेत. त्यामुळे येथील त्रस्त नागरिकांनी लवकरच या विरोधात जन आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

हेही वाचा - 'अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्या'


हेही वाचा - संभाजी ब्रिगेडने वामन पुतळा जाळून राजकीय पुढाऱ्यांचा केला निषे

ABOUT THE AUTHOR

...view details