महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उजनी येथे दुधातून विषबाधा; जुळ्या बहिणींचा मृत्यू, दोघींची प्रकृती गंभीर

महक (वय ११) आणि सुहाना (वय ८) या दोन बहिणींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लातूरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुधातून विषबाधा

By

Published : Feb 9, 2019, 1:43 AM IST

लातूर- औसा तालुक्यातील उजनी येथे दुधातून विषबाधा झाल्याने ३ वर्षीय जुळ्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेत अन्य दोघा बहिणींनाही विषबाधा झाली असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अयुब रुईकर यांना ५ मुली असून त्यांनी शुक्रवारी सकाळी दूध पिले होते. त्यांनतर या पाचही जणींना उलटीचा त्रास सुरू झाला. यामध्ये मारिया हिचा उपचारासाठी दाखल करताना वाटेतच मृत्यू झाला. तर आलमास हिचा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

महक (वय ११) आणि सुहाना (वय ८) या दोन बहिणींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लातूरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अयुब यांची पाचवी मुलगी अलसीया हिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे..

या विषबाधेच्या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे, पोलीस निरिक्षक सालार चाऊस यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details