लातूर - गेल्या दोन वर्षांपासून उदगीर येथील तब्बल १४९ अडत व्यापाऱ्यांनी परवान्यांचे नूतनीकरण केले नाहीत. त्यामुळे त्यांचे अडत परवाने रद्द करण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला आहे. शिवाय अजून १५० अडत व्यापाऱ्यांवर या कारवाईची टांगती तलवार असून, त्यांचेही परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
उदगीरच्या १४९ अडत व्यापाऱ्यांचे परवाने रद्द ; १५० व्यापाऱ्यांवर टांगती तलवार - liscence
५ फेब्रुवारी रोजी अंतिम कारणे दाखवा नोटीस देऊनही याकडे कानडोळा करण्यात आला होता. त्यामुळे पणन संचालक पुणे यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व उदगीर असोसिएशन यांना परवाने रद्द करण्यासंदर्भात आदेश दिले होते. शिवाय या व्यापऱ्यांबरोबर व्यवहार करू नये, असेही सांगण्यात आले आहे.
परवान्यांचे नूतनीकरण करण्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीने सूचना केल्या होत्या. मात्र, याकडे अडत व्यापाऱ्यांकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास नियमाचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या व्यापाऱ्यांनी २०१७ - १८ आणि २०१८ - १९ या दोन वर्षांचे नूतनीकरण केलेले नाही. यासंदर्भात बाजार समितीने वेळोवेळी सूचना शिवाय नोटीसही बजावली होती.
मात्र,५ फेब्रुवारी रोजी अंतिम कारणे दाखवा नोटीस देऊनही याकडे कानडोळा करण्यात आला होता. त्यामुळे पणन संचालक पुणे यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व उदगीर असोसिएशन यांना परवाने रद्द करण्यासंदर्भात आदेश दिले होते. शिवाय या व्यापऱ्यांबरोबर व्यवहार करू नये, असेही सांगण्यात आले आहे. पाहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली असून, उर्वरित १५० व्यापाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार आहे.