लातूर - जिल्ह्यातील चाकूर येथे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्राचा दीक्षांत कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
चाकूर येथील बीएसएफ प्रशिक्षणक केंद्रातून 137 जवानांनी अत्यंत खडतर असे 44 आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. हे जवान देशाचे संरक्षण करण्यासाठी सीमवेर रुजू होणार आहेत.
चाकूर येथील प्रशिक्षण केंद्रात या जवानांना गेल्या 44 आठवड्यांपासून प्रशिक्षण सुरू होते. प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी दीक्षांत कार्यक्रम पार पडला. यावेळी आय. जी. एस. मलिक यांनी जवानांना कर्तव्य बजावण्याबाबत शपथ दिली. या दीक्षांत समारंभात जवानांचे परिवारदेखील सहभागी झाले होते. संदीप राऊत यांनी प्रशिक्षण दिले आहे. हे जवान पाकिस्तान आणि बांग्लादेशला लागून असलेल्या सीमेवर कर्तव्य बाजवणार आहेत. येथील प्रशिक्षण केंद्रातील सोयी व सुविधा उत्तम असल्याचेही पोलीस महानिरीक्षक मलिक यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शहीद जवानांच्या नातेवाईकांशीही संवाद साधला.