महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उत्तरेहून दक्षिणेला निघालेले यात्रेकरू निलंग्यातील मशिदीत; 12 पैकी 8 कोरोनाबाधित - latur police

उत्तर भारतातून दक्षिणेकडे निघालेले यात्रेकरू निलंगा येथे सापडले. यातील बारापैकी 8 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानंतर निलंगा प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

covid19 positive
उत्तरेकडून दक्षिणेकडे निघालेले यात्रेकरू आढळले निलंग्यात; बारापैकी आठ जणांना कोरोनाची लागण

By

Published : Apr 4, 2020, 11:38 PM IST

लातूर -उत्तर भारतातून दक्षिणेकडे निघालेले यात्रेकरू निलंगा येथे सापडले. यातील बारापैकी 8 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानंतर निलंगा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. रुग्णांच्या मशिदीमधील वास्तव्यावरून पोलीस प्रशासनाला आता प्रश्न विचारले जात आहेत. या सर्व प्रकारानंतर निलंग्यातील संपूर्ण मशिदीमध्ये जंतूनाशक फवारणी केली जात आहे.

जिल्हाधिकारी जी श्रीकांत

हरियाणा राज्यातील नूह जिल्ह्यातील फिरोजपूर झिरका येथे गेल्या तीन महिन्यांपासून धार्मिक कार्यासाठी वास्तव्यास असलेले बारा यात्रेकरू 2 एप्रिलच्या मध्यरात्री लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील मशिदीत आढळून आले होते. या बारा जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठवले असता, त्यातील 8 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रुग्णांवर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या महाविद्यालय रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. अन्य चार जणांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन याबाबत सविस्तर माहिती घेत आहे. प्रशासनाने सर्व यात्रेकरूंवर तसेच अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आलेल्या यात्रेकरूंवर उपचार करताना, पुरेशी काळजी घेण्यात यावी आणि कोणत्याही परिस्थितीत याची कुणालाही लागण होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे आणि या सर्वांवर उपचार करून लॉकडाऊननंतर त्यांच्या मूळ गावी पाठविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. हे सर्व यात्रेकरू निलंगा येथील ज्या मशिदीत आढळले होते तेथे ते कोणाच्या संपर्कात आले, त्याचप्रमाणे त्यांच्या हरियाणा ते लातूरपर्यंतच्या प्रवासात कुठे आणि कुणाकुणाच्या संपर्कात आले याचा शोध चालू आहे.

हे बाराजण हरियाणा राज्यातील नुह जिल्ह्यातील फिरोजपूर झिरका येथे गेल्या तीन महिन्यापासून धार्मिक कार्यासाठी वास्तव्यास होते. आंध्र प्रदेशला जाण्यासाठी ते इंदोरहून धुळे मार्गे औरंगाबाद-उस्मानाबाद का आले? इंदोरच्या पोलीस अधीक्षकांचे पत्र दाखवून ते उस्मानाबाद शहरातील मशिदीमध्ये कोणाच्या परवानगीने राहिले? असे काही प्रश्न निर्माण झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details