लातूर - जिल्ह्यातील उदगीर शहरात 27 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी 11 रुग्णांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना लवकरच रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. ही माहिती उदगीर शहरासह जिल्ह्यासाठीही दिलासादायक ठरली आहे.
दिलासादायक! उदगीर येथील 11 कोरोना रुग्ण ठणठणीत; डिस्चार्जनंतर करणार होम क्वारंटाईन
गेल्या पंधरा दिवसात एकट्या उदगीर शहरात कोरोना रुग्णाची संख्या ही 27 वर गेली होती. मात्र, पहिल्या टप्प्यात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची प्रकृती आता चांगली असून त्यांना लवकरच होम क्वारंटाईन केले जाणार असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे.
गेल्या पंधरा दिवसात एकट्या उदगीर शहरात कोरोना रुग्णाची संख्या ही 27 वर गेली होती. मात्र, पहिल्या टप्प्यात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची प्रकृती आता चांगली असून त्यांना लवकरच होम क्वारंटाईन केले जाणार असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. सध्या या रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे त्यांची नियमीत तपासणी करून डिस्चार्ज दिला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह उदगीरमध्ये केवळ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे समोर येत होते. मात्र, सोमवारी या रुग्णांपैकी 11 जणांची प्रकृती बरी असल्याचे समजताच समाधान व्यक्त होत आहे. यासोबतच, उदगीर शहरातील रुग्णांच्या संख्या कमी करणे आणि उर्वरित जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्याचा उद्देश आणि आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे.