लातूर - लोकशाहीच्या महोत्सवात तरुणापासून ज्येष्ठांपर्यंतच्या नागरिकांनी सहभागी व्हावे, मताचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. तरुणांबरोबर ज्येष्ठ नागरिकही मतदान केंद्रावर दाखल होत आहेत. जिल्ह्यातील हरंगूळ (बु) येथील १०५ वर्षाच्या कबईबाई गणपत कांबळे या आजींनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांचे नातेवाई त्यांना मतदानासाठी व्हीलचेअरवर घेऊन आले होते.
जाणले मताचे मोल.. लातूरमध्ये 105 वर्षांच्या कबईबाईंनी बजावला मतदानाचा हक्क - old
जिल्ह्यातील हरंगूळ (बु) येथील १०५ वर्षाच्या कबईबाई गणपत कांबळे या आजींनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या नातेवाई त्यांना मतदानासाठी व्हीलचेअरवर घेऊन आले होते.
लातूरमध्ये 105 वर्षाच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क
मतदान केल्यानंतर कबईबाई यांनी नव्या मतदारांना आपला हक्क बजावण्यास सांगितले. कबईबाई यांचा उत्साह पाहून नक्कीच मतदान वाढणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Last Updated : Apr 18, 2019, 12:00 PM IST