कोल्हापूर - गोठ्यात शिरून जनावरांवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मगरीला जेरबंद करण्यात दोन तरुणांना यश आले आहे. जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील ही घटना आहे.
जनावरांवर हल्ला करण्याच्या तयारीत असणारी मगर २ तरुणांकडून जेरबंद - कोल्हापूर
गोठ्याजवळच १० फुट लांबीची मगर येऊन म्हशी, गाईंवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ शेजारी राहणाऱ्या सर्व नातेवाईकांना बोलावून दोरखंडाच्या साहाय्याने मगरीला जेरबंद केले.
गावातील नदीतील पाणी कमी झाल्यामुळे मगरींनी आपला मोर्चा जवळच असलेल्या जनावरांच्या गोठ्यांकडे वळवला आहे. त्यामुळे मगरीपासून मनुष्याबरोबर प्राण्यांच्याही जीवितास धोका निर्माण झाला आहे. जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करण्याकरीता संदीप आणि सचिन हे दोघे भाऊ शेतातकडे निघाले होते. जाताना गोठ्याजवळच १० फुट लांबीची मगर येऊन म्हशी, गाईंवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ शेजारी राहणाऱ्या सर्व नातेवाईकांना बोलावून दोरखंडाच्या साहाय्याने मगरीला जेरबंद केले. त्यामुळे जीवितहानी टळली.
वर्षभरामध्ये मगर पकडण्याची ही दुसरी घटना आहे. या मगरींपासून शिरोळ नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अंदाजे २० कुटुंब असलेल्या या वस्तीतील नागरिकांनी धास्तीच घेतली आहे. वन विभागाने तत्काळ या गोष्टीची दखल घेऊन नागरिकांना होणारा मगरीचा त्रास थांबवावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.