कोल्हापूर : पती फिरायला घेऊन जात नाही, तसेच स्मार्ट फोन घेऊन दिला नाही या कारणाने वैफल्यग्रस्त झालेल्या नवविवाहितेने आत्महत्या केली आहे. कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे या गावात ही घटना घडली आहे. प्रियांका वैभव लोकरे (वय 19) असे मृत महिलेचे नाव असून याबाबत पती वैभव लोकरे याने पन्हाळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या :
घटनास्थळावरून आणि पोलिसांनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी प्रियांका हिचा पोर्ले येथील वैभव लोकरे याच्याशी विवाह झाला होता. प्रियांकाचा पती वैभव हा गवंडी काम करतो. वैभवच्या घरची परिस्थिती सुद्धा हलाखीची आहे. दररोज काम केले तरच घर चालेल अशी परिस्थिती आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून प्रियांका वैभवकडे आपल्याला टच स्क्रीन मोबाईल हवा असल्याची मागणी करत होती. शिवाय फिरायला सुद्धा घेऊन जाण्याबाबत आग्रह करत होती. त्या गोष्टी पुरवू शकत नसल्याने तिने सोमवारी आत्महत्या केली असल्याची तक्रार स्वतः पती वैभवने पन्हाळा पोलिसांत दिली आहे. त्यानुसार सोमवार दुपारी दोनच्या सुमारास राहत्या घरातील पोट माळ्यावर नॉयलनच्या दोरीने गाळपास घेऊन प्रियांका लोकरे हिने आत्महत्या केली असल्याबाबत नोंद झाली आहे. मृत प्रियांकाचे शवविच्छेदन पन्हाळा ग्रामीण रूग्णालयात झाले. पुढील तपास पन्हाळा पोलीस करत आहेत.
वर्षभरापूर्वी झाले होते लग्न, १९ वर्षीय पत्नीने 'या' कारणासाठी केली आत्महत्या - कोल्हापूर क्राईम
ती फिरायला घेऊन जात नाही, तसेच स्मार्ट फोन घेऊन दिला नाही या कारणाने वैफल्यग्रस्त झालेल्या नवविवाहितेने आत्महत्या केली आहे. कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे या गावात ही घटना घडली आहे. प्रियांका वैभव लोकरे (वय 19) असे मृत महिलेचे नाव असून याबाबत पती वैभव लोकरे याने पन्हाळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
महिलेची आत्महत्या