महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूरात मतदानाला सुरुवात; जिल्ह्यात 281 मतदान केंद्र - पुणे शिक्षक मतदार संघ

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील मतदानाला सुरुवात झाली असून जवळपास 281 मतदान केंद्रांवर कोल्हापूर जिल्ह्यात मतदान होत आहे. त्यासाठी जवळपास साडेतीन हजारहून अधिक कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

voting-begins-for-pune-teachers-and-graduate-constituency-in-kolhapur
कोल्हापूरात मतदानाला सुरुवात

By

Published : Dec 1, 2020, 9:48 AM IST

कोल्हापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील मतदानाला सुरुवात झाली असून जवळपास 281 मतदान केंद्रांवर कोल्हापूर जिल्ह्यात मतदान होत आहे. त्यासाठी जवळपास साडेतीन हजारहून अधिक कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक मतदाराची तपासणी केली जात आहे. याठिकाणी सोशल डिस्टन्स राखण्याबाबत सुद्धा सूचना दिल्या जात असून त्यापद्धतीने बॉक्स सुद्धा मार्क करण्यात आले आहेत. आत्तापासूनच मतदान केंद्रावर मतदार यायला लागले असून सायंकाळी 5 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. याबाबतच अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...

कोल्हापूरात मतदानाला सुरुवात..
कोल्हापूर इतके मतदार -राज्यात पदवीधर मतदारांची संख्या 4 लाख 26 हजार 257 इतकी आहे. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 86 हजार पदवीधर मतदार आहेत. राज्यातील 72 हजार 545 शिक्षक मतदारांपैकी जवळपास 12 हजार शिक्षक मतदार हे कोल्हापूरचे आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details