महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vitthal Birdev Yatra : पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ

कोल्हापूरातील पट्टण कोडोली येथील विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ ( Vitthal Birdev Yatra begins ) झाला आहे. धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेल येथे विठ्ठल-बिरदेवाचे प्राचीन मंदिर ( place of worship for Vitthal Birudev Dhangar community ) आहे.

Vitthal Birdev Yatra
Vitthal Birdev Yatra

By

Published : Oct 16, 2022, 7:33 PM IST

Updated : Oct 16, 2022, 8:34 PM IST

कोल्हापूर - महाराष्ट्रासह राज्यभरातील भविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कोल्हापूरातील पट्टण कोडोली येथील विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ ( Vitthal Birdev Yatra begins ) झाला आहे. धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेल येथे विठ्ठल-बिरदेवाचे प्राचीन मंदिर ( place of worship for Vitthal Birudev Dhangar community ) आहे. यालाच बिरोबा असेही म्हणतात. बिरोबा हे पट्टणकोडोली गावचे कुलदैवत ( Village deity of Pattankodoli ) आहे. गावात दरवर्षी विठ्ठल-बिरदेवाची यात्रा ( Vitthal Birdev Yatra ) भरते.

लाखो भाविक दाखल -यात्रेसाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून सुद्धा लाखोंच्या संखेने भाविक येतात. भंडाऱ्याची उधळण केली जाते. तसेच बाळलोकर, खारीक,पैसे यांची सुद्धा उधळण केली जाते. फरांडे बाबांकडून केली जाणारे भाकीत म्हणजेच पाऊस आणि पीकपाण्याचा वर्तवला जाणारा अंदाज या यात्रेचे वैशिष्ट्य आहे. दरम्यान भंडाऱ्याची मुक्त उधळण होत असल्याने पट्टणकोडोली गावाला जणू सोन्याची झळाळी आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

गावचावडीत मानाच्या तलवारीचे पूजन -परंपरेनुसार फरांडेबाबा यांची भाकणूक काल पार पडली. यामध्ये फरांडे बाबांनी येत्या वर्षाभरात काय होणार याचा दर वर्षी प्रमाणे यंदाही अंदाज वर्तवला आहे. यात त्यांनी राजकारणात गोंधळ होऊन प्रचंड उलथापालथ होईल असे भाकीत केले आहे. शेतकरी राजा खरा राजा होणार आहे अशी भाकीत केले आहे. या यात्रेला महाराष्ट्र सह कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा उत्तर प्रदेश येथील असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेली दोन वर्ष कोरोना संसर्गामुळे ही यात्रा ठराविक मानकरांसोबतच पार पडली होती. यात्रेदरम्यान विधिवत कार्यक्रमांना सुरुवात झाली. प्रथम गावचावडीत मानाच्या तलवारीचे पूजन झाले. तलवारीसह मानकरी, धनगर समाजाचे पंच मंडळींनी फरांडेबाबांची भेट घेतली. यावेळी फरांडेबाबानी पुढीलप्रमाणे भाकीत केली आहे.


Last Updated : Oct 16, 2022, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details