कोल्हापूर- जिल्ह्यातील काही भागात आज सायंकाळी पावसाने हजेरी लावली. तर आजरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. या गारपीटीमुळे येथील काजू, आंबे फळबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच या गारपिटीमुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनासुद्धा दिलासा मिळाला आहे.
कोल्हापुरात गारपीट, फळबागांना बसणार फटका - आंबे
आज सायंकाळी कोल्हापूर परिसरात वादळी पावसाने हजेरी लावली. या गारपीटीमुळे येथील काजू, आंबे फळबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर परिसरात आज गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक वातावरणात बदल होऊन सायंकाळी ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. काही भागातील वीजपुरवठासुद्धा खंडित करण्यात आला होता. ऐन उन्हाळ्यात पडलेल्या या पावसामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
आज दुपारपासूनच कोल्हापुरात ढगाळ वातावरण तयार झाले होते. वातावरणातील तापमानाचा पारासुद्धा 38 डिग्री सेल्सिअसवर गेले आहे. तापमानाचा पारा वाढल्याने दोन दिवसापासून नागरिक हैराण झाले होते. आज सायंकाळी वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी गारपीट झाली. यामुळे वातावरण अल्हाददायक झाले आहे.