कोल्हापूर -क्वारंटाईनचे उल्लंघन करणे शिरोळ येथील दोघांना महागात पडले आहे. जयसिंगपूर न्यायालयाने या दोघांना 1 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. सोबत दोन हजार रुपये दंडाचीसुद्धा शिक्षा दिली आहे.
क्वारंटाईनचे उल्लंघन.. न्यायालयाने दोघांची तुरुंगात केली रवानगी - home quarantine
गणेश कुंभार आणि निखिल कलशे (रा. शिरोळ) अशी होम क्वारंटाईन उल्लंघन केलेल्या दोघांची नावे आहेत.
असच पाहिजे...क्वारंटाईनचे उल्लंघन केल्यामुळे न्यायालयाने दोघांना पाठवले तुरुंगात
गणेश कुंभार आणि निखिल कलशे (रा. शिरोळ) अशी होम क्वारंटाईन उल्लंघन केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांची थेट कोल्हापुरातील बिंदू चौकातील जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे. शिवाय लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या इतर 4 जणांवरसुद्धा दंडात्मक कारवाई करत त्या चौघांना 16 हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. शिरोळ पोलीस ठाणे येथे कोरोना संदर्भात दाखल गुन्ह्यांतील आरोपींना बुधवारी न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.