कोल्हापूर- एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र पूरग्रस्तांच्या मदतीला धावत त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे येथील तावडे हॉटेल परिसरात पुरात बुडालेल्या रस्त्यावरील बॅट विक्रेत्याच्या दुकानावर हायवेवरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी डल्ला मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार काही पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्या डोळ्यासमोरच घडला आहे. विशेष म्हणजे एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हातातसुद्धा एक बॅट पाहायला मिळाली.
असंवेदनशीलतेचा कळस; पुराच्या पाण्यात बुडालेल्या बॅटच्या दुकानावर महामार्गावरून जाणाऱ्यांनी मारला डल्ला - असंवेदनशील
पुरात बुडालेल्या रस्त्यावरील बॅट विक्रेत्याच्या दुकानावर हायवेवरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांनी डल्ला मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार काही पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्या डोळ्यासमोरच घडला आहे.
कोल्हापूर
पुराचे पाणी वाढत होते तेव्हा आपले रस्त्याकडेला मांडलेले दुकान सोडून गेलेला विक्रेता जेव्हा परत आपल्या या छोट्याशा दुकानाजवळ येईल तेंव्हा एकही बॅट त्याला त्या ठिकाणी दिसणार नाही. राष्ट्रीय महामार्ग जेव्हा दोन्ही बाजूंनी सुरू झाला त्याच्या काही तासांपूर्वीची ही घटना आहे. अशा असंवेदनशील लोकांबद्दल कोल्हापूरातील नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.