कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली आहे. यामुळे लाखो जण आहे त्याच ठिकाणी अडकले आहे. अशाच अडकलेल्या परप्रांतीयांना घेऊन कोल्हापुरातून श्रमिक विशेष रेल्वे सोमवारी सायंकाळी पाच वाजता निघाली आहे. बाराशे प्रवाशांसह ही रेल्वे मध्यप्रदेशच्या जबलपूरला सुटली आहे.
कोल्हापुरातून बाराशे परप्रांतियांना घेऊन श्रमिक विशेष रेल्वे जबलपूरला रवाना - श्रमिक विशेष रेल्वे बातमी
कोल्हापुरात अडकलेल्या बाराशे परप्रांतीय नागरिकांना घेऊन एक श्रमिक विशेष रेल्वे मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात आज (दि. 11 मे) सायंकाळी पाच वाजता निघाली आहे.
ही रेल्वे कोल्हापूरच्या छत्रपती शाहु महाराज टर्मिनस येथून रवाना होणार आहे. सोमवार (दि. 11 मे) सकाळपासूनच या रेल्वे स्थानकावर जबलपूरला जाण्यासाठी परप्रांतीय नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासन आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना बाबतीतील काटेकोर उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रवाशाची थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी केली जात आहे. तसेच त्यांना मास्क आणि सॅनिटायझरचा सुद्धा वापर केला जात आहे. संपूर्ण रेल्वे निर्जंतुकीकरण करण्यात आली असून प्रत्येक प्रवाशाची काटेकोरपणे काळजी प्रशासन घेत आहे. दरम्यान, अजूनही मोठ्या संख्येने कामगार कोल्हापुरात अडकून आहेत त्यांना सुद्धा टप्प्या टप्प्याने पाठविण्याची सोय करण्यात येणार आहे.
हेही वाचा -पाण्यासाठी दोन गावांतील ग्रामस्थांमध्ये दगडफेक; चंदगड तालुक्यातील घटना