कोल्हापूर - पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहे. चिखली गावाकडे जात असताना वडणगे मेन रोडवर आपल्या शेता शेजारी काही शेतकऱ्यांना ते पथक भेटणार होते. मात्र, ते पथक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरून पुढे निघून गेल्याने शेतकरी नाराज झाले.
शेतकरी केंद्रीय पथकाची पहात होते वाट.. पण पाहणीसाठी पथक थांबलेच नाही - पूरस्थितीची पाहणी
पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक कोल्हापूर मध्ये दाखल झाले आहे. काही शेतकऱ्यांना ते पथक भेटणार होते. मात्र, ते पथक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरून पुढे निघून गेल्याने शेतकरी नाराज झाले.
पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहे..येथील कसबा बावडा परिसरातील राजाराम बंधाऱ्याची पाहणी केल्यानंतर हे पथक वडणगे आंबेवाडी, चिखली अशा तीन गावांना भेट देणार होते. चिखली गावाकडे जात असताना येथील वडणगे मेन रोडवर आपल्या शेता शेजारी काही शेतकऱ्यांना ते पथक भेटणार होते. तासाभरापासून शेतकरी पथकाची वाट पाहत होते. पण हे पथक त्यांच्या डोळ्यासमोरून पुढे निघून गेले. आम्हाला थांबायला सांगितले होते पण आता निघून गेल्यावर आम्ही काय करणार असे हतबल होत शेतकऱ्यांनी उत्तरे दिली.
शेतकऱ्यांच्या नावाचा आणि शेतीच्या गट नंबरचा आशय असलेला फलक हाती घेऊन येथील तलाठी उभे राहिले होते. पथकच पुढे गेल्यामुळे सगळ्यांचीच याठिकाणी निराशा झाली. शेवटी थांबलेले अधिकारीसुद्धा तो फलक त्या शेतकऱ्यांच्याच हातात सोपवून पथकामागे निघून गेले.