कोल्हापूरTanaji Sawant Car Accident:आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे आज (रविवारी) कोल्हापूर दौऱ्यावर आले असून ते सकाळी गारगोटी येथे कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यानंतर ते दुपारी अडीचच्या सुमारास श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी दाखल झाले. (Tanaji Sawant on Corona variant) अंबाबाईचे दर्शन घेऊन ते श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे ज्योतिबाच्या दर्शनाला निघाले होते. याच वेळी कोल्हापूर पन्हाळा महामार्गावर राजपूत वाडी येथे त्यांचा ताफा आला असता यावेळी त्यांच्याच ताफ्यातील गाडीने तानाजी सावंत यांच्या गाडीला मागून जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तानाजी सावंत यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांचे स्वीय सहाय्यक हे जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्रीच दौऱ्यावर आले असताना देखील त्यांच्या सुरक्षेमध्ये रुग्णवाहिका नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. (Health Minister Tanaji Sawant)
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला घाबरण्याचे कारण नाही:मंत्री तानाजी सावंत यांनी अपघाताच्या आधी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांची संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाचा नवीन आलेला व्हेरियंट 'JN 1' हा माईल्ड असून या व्हायरसला घाबरण्याचं कारण नाही, असं म्हटलयं. तसेच WHO ने दिलेल्या निर्देशानुसार सर्व महत्त्वाच्या हॉस्पिटलमध्ये मॉकड्रिल घेण्यात आले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये; मात्र खबरदारी म्हणून सर्वांनी मास्क वापरावे असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे.