कोल्हापूर -साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना आव्हान देत शेतकऱ्यांकडून दबाव टाकून सह्या घेतल्या आहे. यामुले शेतकऱ्यांना आता रस्त्यावरची आणि कायदेशीर, अशा दोन्ही लढाया लढाव्या लागणार आहेत, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी संघटनेच्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपी मिळण्यासाठी साखर आयुक्तांकडे अर्ज पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले. गळीत हंगामाचा बिगुल वाजू लागला आहे. या पार्श्वभुमीवर चालू वर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या ऊस परिषदेच्या नियोजनाबाबत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची शिरोळ येथील राजू शेटटी यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
तर अखेर स्वाभिमानाची यावर्षीची सुद्धा ऊस परिषद होणार आहे. चालू वर्षीची 19वी उस परिषद 2 नोव्हेंबरला जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रिडांगणावर होणार, अशी माहितीही राजू शेट्टी यांनी दिली. त्यामुळे आता संपूर्ण राज्याचे 2 नोव्हेंबरला होणाऱ्या ऊस परिषदेकडे लक्ष लागले आहे. यात किती दर मागितला जातो? हे पाहावे लागणार आहे.