कोल्हापूर Son Killed Mother :व्यसनाच्या आहारी गेलेल्या (alcohol addiction) पोटच्या गोळ्याने दारूला पैसे दिले नाहीत म्हणून आईचाच निर्घृण खून केल्याची घटना कोल्हापुरातील कागल तालुक्यातील वंदूरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी निलेश वाईंगडे याला कागल पोलिसांनी ताब्यात घेतलंय. (Kolhapur Crime)
दारूच्या नशेत आईवर केले वार :शेतमजुरी करून उदरनिर्वाह करत असलेल्या कागल तालुक्यातील वंदूर येथील सुनिता अशोक वाईंगडे (वय 51 वर्ष) यांच्याशी मुलगा निलेश वाईंगडे याची दारूच्या पैशावरून वारंवार भांडणं होत होती. शेजाऱ्यांनी अनेकवेळा मायलेकरांचा हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, बुधवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत घरी आलेल्या निलेशने आईसोबत दारूला पैसे देत नाही म्हणून पुन्हा वाद केला. या वादातून निलेशने आई सुनीतावर वार केले तसंच तिचा खून केला. आज सकाळी शेजारच्यांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी कागल पोलिसांना याबाबतची माहिती दिली. कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, उपनिरीक्षक रविकांत गच्चे यांच्यासह वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कागल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
नातेवाईकांचा आक्रोश :दिवसभर काबाडकष्ट करून सुनीता वाईंगडे यांनी आपल्या मुलाला मोठं केलं होतं. मात्र, निलेश वांगडे दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. दररोज दारू पिऊन तो घरी यायचा. कोणताही कामधंदा करत नसल्याने आईसोबत त्याचा वारंवार वाद होत होता. बुधवारी संध्याकाळीही असाच प्रकार घडला आणि यानंतर निलेशने जन्मदात्या आईचाच निर्घृण खून केला. यानंतर नातेवाईकांनी मृतदेह पाहून केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. पोलिसांनी निलेशला ताब्यात घेतल्यानंतर नशेतच असलेल्या निलेशला काय केलं आहे याची पुरेशी कल्पनाही नव्हती. दारूच्या नशेत पोटचा गोळाच कर्दनकाळ ठरल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.
पंचनामा करून मृतदेह ताब्यात :कागल तालुक्यातील वंदूर येथे सुनीता वाईंगडे यांचा मुलाने खून केल्याची घटना उघडकीस आली. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला तसंच संशयित आरोपी निलेश वाईंगडे याला कागल पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा:
- Mother Murdered: गोळ्या झाडून मुलाने केली आईची हत्या.. दोन दिवस मृतदेह घरात ठेऊन खेळला क्रिकेट..
- लग्न होत नसल्याच्या कारणाने साताऱ्यात मुलाने केली आईची हत्या
- मनोरुग्ण मुलाने केली आईची हत्या, कात्रीने केले गळ्यावर वार