कोल्हापूर - जिल्ह्यातील कागलमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथील नगरपालिकेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाजारांच्या पुतळ्याचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मंत्री मुश्रीफ यांनी शिवरायांच्या पुतळ्याला जल आणि दुधाचा अभिषेकसुद्धा घातला. यावेळी "छत्रपती शिवाजी महाराज की जय" या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.
कागलमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते जल आणि दुग्धाभिषेक - हसन मुश्रीफ लेटेस्ट न्यूज
कागलमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथील नगरपालिकेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कागलमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात
बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यालासुद्धा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश माळी, उपनगराध्यक्ष सतीश घाडगे, नितीन दिंडे, प्रविण काळबर, बाबासाहेब नाईक, आनंदा पसारे, कागल पोलीस प्रमुख दत्तात्रय नाळे, मुख्याधिकारी पंडितराव पाटील आदी उपस्थित होते.
Last Updated : Jun 6, 2020, 5:39 PM IST