शाही दसऱ्याची तयारी पूर्ण कोल्हापूर : Shahi Dussehra २०२३ : छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीर नगरीत, पारंपरिक विजयादशमीचा (Vijayadashami) शाही दसरा सोहळा (kolhapurs shahi Dussehra) ऐतिहासिक दसरा चौकात दिमाखात (Dussehra Chowk) साजरा केला जातोय. यंदा राज्य सरकारने कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर 'दसरा महोत्सव समिती'च्यावतीनं ऐतिहासिक दसरा चौक मैदानावर जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
शासनाच्या वतीनं जोरदार तयारी : यंदा कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यात राज्य शासनानेही सहभाग घेतल्याने शासनाच्या वतीनं जोरदार तयारी करण्यात आली आहे. छत्रपती घराण्याची मिरवणूक ही शाही पद्धतीने निघावी यासाठी शासनाने नियोजन केले होते. यानुसार यावेळी निघणाऱ्या शाही मिरवणुकीत सजवलेले उंट, मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, इतिहासाच्या स्मृती जागवणारे पोवाडे, पारंपरिक पद्धतीने निघालेल्या देवीच्या पालख्या अशा मिरवणुका उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेणार आहेत.
यांची असणार कार्यक्रमासाठी उपस्थिती :नवीन राजवाड्यातून खास 'मेबॅककार'मधून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती (Shrimant Shahu Maharaj), संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती यांच्यासह राजघराण्यातील सदस्य या शाही कार्यक्रमासाठी उपस्थिती लावणार आहेत. यानंतर सूर्यास्ताच्या साक्षीने शमीपूजनाचा कार्यक्रम होऊन, सीमोल्लंघनाचा कार्यक्रम अर्थात सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो. यावेळी राजघराण्याप्रती करवीरची जनता मानवंदना अर्पण करते. कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं शाही दसरा महोत्सवासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
पोलीस अधीक्षकांनी केली पाहणी : 'ऐतिहासिक दसरा चौकात' शाही दसरा महोत्सव होणार असल्यानं या ठिकाणची पाहणी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केली. वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी दसरा चौक मैदानापासून ५०० मीटरच्या परिघामध्ये नो पार्किंग झोन करण्यात आले आहे. पालखी मार्ग असलेल्या ठिकाणी आणि राजघराण्यातील सदस्य ज्या मार्गावरून दसरा चौक मैदानाकडे येतात अशा मार्गांवर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
हेही वाचा -
- Dussehra 2023 : वाईटाचं प्रतीक मानलं जाणाऱ्या रावणाचे हे आहेत गूण आणि अवगूण; जाणून घ्या
- Dussehra 2023 : या दसऱ्याला घडत आहेत अनेक दुर्मिळ योगायोग; जाणून घ्या शुभ मुहूर्त
- Sai Baba Death Anniversary : शिर्डीत साईबाबांच्या पुण्यतिथीचा उत्सव; राम मंदिराची कमान ठरणार साईभक्तांचे आकर्षण