महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांवर दया करून आंदोलन संपवावे : हसन मुश्रीफ

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून त्यांच्यावर दया करावी आणि आंदोलन संपवावे, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये सलोखा परिषदेच्यावतीने आयोजित सर्वपक्षीय शेतकरी आंदोलनाला मंत्री मुश्रीफ यांनी पाठिंबा दिला, यावेळी ते बोलत होते.

कोल्हापूर
कोल्हापूर

By

Published : Jan 2, 2021, 5:33 PM IST

कोल्हापूर- हाडं गोठवणार्‍या कडाक्‍याच्या थंडीतही दिल्लीमध्ये आंदोलक शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांच्यावर दया करावी आणि आंदोलन संपवावे, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये सलोखा परिषदेच्यावतीने आयोजित सर्वपक्षीय शेतकरी आंदोलनाला मंत्री मुश्रीफ यांनी पाठिंबा दिला, यावेळी ते बोलत होते.

कोल्हापूर

पंतप्रधान मन की बातमधून मुक्त चिंतन करताना दिसत आहेत -

यावेळी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, पिकांना हमीभाव मिळावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांना करार शेतीची भीती वाटत आहे. त्यामुळेच, शेतकरी काळ्या कायद्यांच्या विरोधात गेले महिनाभर थंडी वाऱ्याची तमा न बाळगता दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. एका बाजूला बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला हरताळ फासत शेतकरी विरोधी निर्णय घेणारे व आंदोलनाकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसरीकडे मात्र मन की बातमधून मुक्त चिंतन करताना दिसत आहेत. एकदा गुजरातमधून, एकदा आंध्रातून मन की बातमधून बोलणाऱ्या पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांशी बोलायला मात्र अपमान वाटत आहे. कुठलाही कायदा तयार करत असताना त्याच्यावर समर्पक चर्चा व्हायला हवी, कारण अशा कायद्यामुळे संबंधित घटकांवर दूरगामी परिणाम होत असतात असेही मुश्रीफ यावेळी म्हणाले.

केडीसीसीची बिनव्याजी पिककर्ज योजना मोदींच्या किसान सन्मानपेक्षा चौपट लाभाची -

यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किसान सन्मान योजनेत शेतकऱ्याला महिन्याला पाचशे प्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये मिळतात. केडीसीसी बँकेकडून तीन लाखापर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी देणार असून शेतकऱ्यांनी ही रक्कम बँकेत ठेवली तर त्याची व्याजाची रक्कम पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या किसान सन्मान योजनेतील रकमेपेक्षा चौपट होते. एक लाखाला आठ हजार व्याज, दोन लाखाला सोळा हजार व तीन लाखाला २४ हजार असा व्याजाचा चौपट लाभ शेतकऱ्यांना होईल, असेही ते म्हणाले.

आंदोलनाला यांची होती उपस्थिती -

यावेळी माजी आमदार श्रीपतराव शिंदे, प्रा. किसनराव कुराडे, नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी, बाळेश नाईक, रफिक पटेल, रमजान आत्तार, अरविंद बारदेस्कर, साताप्पा कांबळे, मनोहर दावणे, जे. वाय. बारदेस्कर, संपत देसाई, दळवी वहिनी, सिद्धार्थ बन्ने, सुरेश ठरकार, महेश सलवादे, गुंडेराव पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details