कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातली निवडणूक ही सध्या आरोप-प्रत्यारोपांनी गाजत आहे. या मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथून आघाडीकडून राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक हे तर युतीकडून शिवसेनेचे संजय मंडलिक रिंगणात आहेत. २०१४ च्या निवडणुकीत धनंजय महाडिकांना सहकार्य करणारे काँग्रेसचे आमदार सतेज पाटीलांनी यावेळी त्यांच्या विरोधात भूमिक घेतली आहे. तर चंद्रकांत पाटील यांनीही मंडलीक यांच्या विजयासाठी ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहेत.
मतदारसंघाची पार्श्वभूमी
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात १९९८ पासून २०१४ पर्यंत सदाशिवराव मंडलिक यांचे वर्चस्व राहिले आहे. १९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते कोल्हापूर मतदारसंघातून विजयी झाले होते. सलग ३ वेळा ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून संसदेवर निवडून गेले होते. २००९ च्या निवडणुकीवेळी मंडलिक यांचे शरद पवार यांच्याशी मतभेद झाले आणि लोकसभेची चौथी निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढविली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारत २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारी मागितली. ती न मिळाल्याने त्यांनी पक्षावर तोफ डागली. त्यानंतर सुपुत्र संजय मंडलिक यांनी शिवसेनेत प्रवेश करून ही निवडणूक लढविली. पण यामध्ये राष्ट्रवादीतून तिकीट मिळालेले धनंजय महाडिक ३३ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले.
सतेज पाटलांची भूमिका महत्वाची
आत्ताची निवडणूकसुद्धा धनंजय महाडिक आणि संजय मंडलीक या दोघांमध्येच होत आहे. गतवेळी महाडिक यांना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा पाठिंबा होता. पण तेच सतेज पाटील आता खासदार महाडिक यांच्या विरोधात असून विधानसभेला विश्वासघात केल्याचा आरोप करत आहेत. यावेळी महाडीकांना मदत करणार नसल्याचे सतेज पाटल यांनी सांगितले आहे. त्यामुळे या निवडणुकीत अधिक चुरस निर्माण झाली आहे.
अद्याप तरी या मतदारसंघात कोणाच्या बाजूने कौल लागणार हे स्पष्ट होत नाही. विशेष म्हणजे मंडलिक यांच्या प्रचारात महाडिकांचे जवळचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सहभाग मंडलीक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवणारा आहे. महाडीक यांच्याशी मैत्री असली तरी युतीधर्मानुसार मंडलीक यांना खासदार करणार असे चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिल्याने मंडलिकांना मोठा आधार मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वी महाडिक यांच्या उमेदवरीवर नाराज असलेले राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ हे आता महाडिक यांना निवडून आणण्याचा स्पष्टपणे निर्वाळा देत आहेत. या सगळ्या धामधुमीत पुतण्याला संसदेत पाठवण्यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी भाजपच्या कोषातून बाहेर पडून गाठीभेटी सुरु केल्या आहेत. यावेळी जर निवडून नाही दिले तर आमचे राजकारण संपेल असे भाकीत माहदेव महाडिक यांनी केले आहे.
अमल आणि शौमिका महाडिक यांची भूमिका