कोल्हापूर - टायर सर्व्हिसच्या दुकानासाठी मंजूर झालेल्या 75 हजार रूपयांचा धनादेश मिळवण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागिलल्याप्रकरणी राज्य अपंग वित्त व किकास महामंडळाच्या दोन वसुली निरीक्षकांवर कारवाई केली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले आहे. वसुली निरीक्षक गणेश विठ्ठल लिगाडे आणि अनिल बाळासाहेब पाटील अशी त्यांची नावे आहेत.
कोल्हापुरात वसुली निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात - वसुली निरीक्षक
धनादेश काढल्यानंतर दुचाकीला नवीन टायर घालून देण्याची मागणीही त्यांनी तक्रार दाराकडे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक गुरीश गोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कोल्हापुरात वसुली निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात