कोल्हापूर -राज्यात ओला दुष्काळ ( wet drought ) जाहीर करावा या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी 19 डिसेंबरला नागपूरला विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ ( MLA Hasan Mushrif ) यांनी दिली आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान महाजन आयोगाने ( Mahajan Commission ) चुकीचा अहवाल दिला असल्याे सीमावाद ( Maharashtra Karnataka border dispute ) वाढत असल्याचं आरोप मुश्रीफ यांनी केला.
कर्नाटक वादावर लढण्याची आमची तयारी - तसेच मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी खांद्याला खांदा लावून लढण्याची आमची तयारी असल्याचे ते म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री हे मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकात जाण्यासाठी रोखलं तर, आम्हीही त्यांच्यासोबत जाऊ असेही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. तसंच उदयनराजे यांच्या भूमिकेचे स्वागत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्यामागे उभा आहे असे त्यांनी म्हटले आहे.