कोल्हापूर :एकीकडे गेली 65 वर्षांहून अधिक काळ सीमाप्रश्न प्रलंबित (Karnataka Maharashtra border) आहे. त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील काही भागावर दावा करण्याबाबत विधाने करतात. मात्र ज्या सीमाभागात आम्ही मराठी भाषिक राहत आहे. त्या सर्वांवर नेहमीच अन्याय होत आहे. आम्हाला नोकऱ्या नाहीत किंव्हा कोणत्याच शासकीय सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे आम्ही स्वातंत्र्य मिळूनही अजून पारतंत्र्यात आहोत अशी आमची भावना आहे, असे सीमाभागातील नागरिकांनी म्हटले आहे. स्वतः निपाणीमधील महाराष्ट्र एकीकरण समितीचे लक्ष्मीकांत पाटील आणि अजित पाटील यांनी म्हटले (Reaction of border people on border issue) आहे.
Karnataka Maharashtra Border Issue : अजूनही आम्हाला स्वातंत्र्य नाहीच ; सीमाभागातील लोकं नेमके काय म्हणत आहे ?
एकीकडे गेली 65 वर्षांहून अधिक काळ सीमाप्रश्न प्रलंबित (Karnataka Maharashtra border) आहे. त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील काही भागावर दावा करण्याबाबत विधाने करतात. आम्ही स्वातंत्र्य मिळूनही अजून पारतंत्र्यात आहोत अशी आमची भावना आहे, असे सीमाभागातील नागरिकांनी म्हटले आहे. स्वतः निपाणीमधील महाराष्ट्र एकीकरण समितीचे लक्ष्मीकांत पाटील आणि अजित पाटील यांनी म्हटले (Reaction of border people on border issue) आहे.
नागरिक आक्रमक :दरम्यान, महाराष्ट्रातली 40 गावांना आम्ही पाणी देतो आणि तिथल्या गावांनी कर्नाटकात जाण्याबाबतचे ठराव केले आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यावर दावा करत असल्याची बाबतचे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केले. यावर आता सीमाभागातील नागरिक सुद्धा आक्रमक भाषेत त्यांना प्रतिउत्तर देत (Reaction of border people) आहेत.
न्यायालयात वादही सुरू :गेल्या अनेक वर्षांपूर्वीच सीमा भागातील 800 हून अधिक गावांनी आम्हाला महाराष्ट्रात जाण्याबाबतचे ठराव करून दिले आहेत. त्याबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडवी. त्यांनी केलेले हे विधान हास्यास्पद आहे. याबाबत न्यायालयात वादही सुरू आहे. मात्र अशा प्रकारचे वक्तव्य करून सीमा भागातील मराठी भाषिकांच्या रागाचा अंत पाहू नका, असे महाराष्ट्र एकीकरण समितीचे कपिल बेलवले यांनी म्हटले (Reaction of border people on border issue) आहे.