कोल्हापूर -काही दिवसापूर्वीच मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेमध्ये प्रवेश केलेले रविकांत तुपकर हे पुन्हा घरवापसी करणार आहेत. ते परत राजू शेट्टींच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
रविकांत तुपकरांची घरवापसी? पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत करणार प्रवेश - raju shetti
काही दिवसापूर्वीच मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेमध्ये प्रवेश केलेले रविकांत तुपकर हे पुन्हा घरवापसी करणार आहेत. ते परत राजू शेट्टींच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
रविकांत तुपकर
काही दिवसापूर्वी रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीमाना दिला होता. त्यानंतर ते सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेमध्ये गेले होते. मात्र, लगेच ते स्वाभिमानीमध्ये प्रवेश करणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.