महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rautwadi Waterfall Radhanagari : राऊतवाडी धबधबा पर्यटकांसाठी पुन्हा खुला; पाहा ड्रोनद्वारे धबधब्याचे मनमोहक दृश्य - कळंबा तलाव

संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला राऊतवाडी धबधबा पर्यटनासाठी पुन्हा खुला करण्यात येत आहे. आठवडाभरानंतर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने या ठिकाणी पर्यटकांची पुन्हा गर्दी होण्याची शक्यता आहे. तर ईटीव्हीच्या प्रेक्षकांसाठी खास ड्रोनद्वारे घेण्यात आलेले धबधब्याचे मनमोहक दृश्य पाहा.

Rautwadi waterfall
राऊतवाडी धबधब्याचा ड्रोन व्ह्यु

By

Published : Jul 30, 2023, 9:34 AM IST

राऊतवाडी धबधब्याचा ड्रोन व्ह्यु

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील वर्षा पर्यटनासाठी आकर्षण असलेला राऊतवाडी धबधबा पुन्हा एकदा सुरू झाला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हा धबधबा धोकादायक झाला होता. धबधब्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येत होता. यामुळे प्रशासनाने 20 जुलैपासून या भागात कलम 144 अंतर्गत बंदी आदेश घातला होता. अनिश्चित काळासाठी धबधबा पर्यटनासाठी बंद करण्यात आला होता. मात्र, आता पावसाचा जोर कमी झाल्याने हा धबधबा पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे. रविवारी असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक येथे येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाकडून देखील बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मनमोहक दृश्य :राधानगरी धरणाचे शनिवारी सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले होते. तसेच पावसाने देखील विश्रांती घेतल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत घट होण्यास सुरुवात झाली होती. मात्र, धरण पाणलोट क्षेत्रात आज पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे पाण्याची आवक धरणात वाढत असल्याने राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा पुन्हा खुला झाला आहे. स्वयंचलित दरवाजा क्रमांक 6 उघडला आहे. यातून 1428 क्युसेक तर पॉवर हाऊसमधून 1400 क्युसेक असा एकूण 2 हजार 828 क्युसेक विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे पर्यटकांना राऊतवाडी धबधबा तसेच स्वयंचलित दरवाजाचे मनमोहक दृश्य पाहता येणार आहे.

कळंबा तलावही ओव्हरफ्लो : निम्म्या कोल्हापूरची तहान भागवणारा आणि पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत असणारा ऐतिहासिक शाहू कालीन कळंबा तलाव देखील पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून वाहू लागला आहे. तलाव ओव्हरफ्लोझाल्याचे वृत्त सोशल मीडियावर झळकताच पर्यटकांची येथे गर्दी होऊ लागली आहे. यंदा जून महिन्यात झालेला कमी पाऊस यामुळे कळंबा तलावाची पाणीपातळी चार फुटांवर स्थिरावली होती. मात्र जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने तलावात मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे शनिवारी दुपारच्या सुमारास कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे कोल्हापूरकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.


हेही वाचा :

  1. Melghat Waterfall : पांढऱ्या शुभ्र पाण्यासह मेळघाटातील धबधबे मोहरले; पर्यटकांची उसळली गर्दी
  2. Madhe Ghat Waterfall Video: पाहा, ड्रोनच्या साहाय्याने टिपलेली मढे घाटातील धबधब्याची मनमोहक दृश्ये
  3. Kalamma Waterfall In Kolhapur : निसर्गाने बहरलेला 'काळम्मा धबधबा' वेधतोय पर्यटकांचे लक्ष; पाहा निसर्गाचा अनमोल ठेवा

ABOUT THE AUTHOR

...view details