महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रकांतदादांनी कधी खुरपं हाती घेतलं असतं तर त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळले असते - राजू शेट्टी - कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त

राजू शेट्टी यांनी 'महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कधी खुरप हातात घेतलं असतं तर त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असती', असा टोला चंद्रकांत पाटील यांना लागावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चाचे आयोजन केले होते. त्यावेळी शेट्टी बोलत होते.

चंद्रकांतदादांनी कधी खुरप हातात घेतलं असतं तर त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असती - राजू शेट्टी

By

Published : Aug 28, 2019, 7:08 PM IST

Updated : Aug 28, 2019, 7:39 PM IST

कोल्हापूर - शासन सर्वतोपरी मदत करत आहे, तरीही शिमगा का, या चंद्रकांत पाटील यांच्या प्रश्नावर राजू शेट्टी यांनी 'महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कधी खुरप हातात घेतलं असतं तर त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असती', असा टोला चंद्रकांत पाटील यांना लागावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चाचे आयोजन केले होते. त्यावेळी शेट्टी बोलत होते.

चंद्रकांतदादांनी कधी खुरप हातात घेतलं असतं तर त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असती - राजू शेट्टी

शेट्टी म्हणाले, चंद्रकांत पाटील आम्हाला शिमगा का करत आहात विचारत आहेत पण, आम्हाला शिमगा करायची गरज का पडली याचे उत्तर स्वतः सरकारने द्यावे. सरकारने वेळेत मदत पोहोचवली असती तर आम्हाला हे आंदोलन करायची गरज नव्हती. आचारसंहिता लागायला काहीच दिवस उरले आहेत. शासन पूरग्रस्तांना मदत कधी पोहोचवणार आहे असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला.

दसरा चौक येथून निघालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येने पुरग्रस्त सहभागी झाले होते. उत्पादक शेतकऱ्यांनी यावेळी खराब झालेल्या ऊस पिकाच्या पेंड्या घेऊन मोर्चात सहभाग नोंदवला. काँग्रेसचे आमदार सतेज पाटीलसुद्धा या मोर्चात सहभागी झाले होते.

Last Updated : Aug 28, 2019, 7:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details