महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हा'पूर' : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग अखेर सुरू, ट्रक बंगळुरुकडे रवाना

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. या ठिकाणी प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरू

By

Published : Aug 12, 2019, 9:45 AM IST

Updated : Aug 12, 2019, 12:47 PM IST

कोल्हापूर- पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. कराड ते कोल्हापूर या मार्गावर अडकून पडलेले हजारो ट्रक आता पुराच्या पाण्यातून वाट काढत बंगळुरुच्या दिशेने रवाना झाले आहेत. सकाळपासून एकेरी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. महामार्गावर प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. महामार्गावर जीवनावश्यक वस्तूंच्या ट्रकना प्राधान्य देण्यात येत आहे. अद्यापही कोल्हापूर जिल्ह्यातील 100 हून अधिक बंधारे पाण्याखाली आहेत.

पुणे-बंगळुरु महामार्ग सुरू

गेल्या 6 दिवसांपासून हा महामार्ग बंद होता. रस्त्यावरून वाहणारे पाणी हळूहळू कमी होत आहे. 10 ऑगस्टच्या रात्रीपासून पाण्याची पातळी अर्धा ते पाऊण फूट कमी झाली आहे. अजूनही महामार्गावरून तीन ते साडेतीन फूट पाणी वाहत आहे. तर पंचगंगा नदीची पाणीपातळी 49 फुटांवर आली आहे. शिरोलीजवळ राष्ट्रीय महामार्गावर अजूनही दीड फूट पाणी आहे. हे पाणी हळूहळू कमी होत आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात असून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत आहे.

Last Updated : Aug 12, 2019, 12:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details