कोल्हापूर- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरात बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. शहर पोलिसांनी २० लाख किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर नोटा तयार करण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
याप्रकरणी बाळू नायकवडी, प्रवीण गडकर, गुरुनाथ पाटील, विक्रम माने यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ हजारांच्या ४५६ आणि ५०० रुपयांच्या १५५७ नोटा जप्त केल्या आहेत. या टोळीने अजून किती नोटा बाजारात आणल्या आहेत, याचा तपास पोलीस करत आहे.