कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात नाकाबंदी सुरू आहे. नाकाबंदी दरम्यान एसटी बसमधून बॅगेतून एअरगन, कुकरी, छरे असे अवैध साहित्य घेऊन जाणाऱ्या प्रवाशास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ही शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील वनविभागाच्या कार्यालयासमोर ही कारवाई झाली.
एसटीमधून अवैध शस्त्रे घेऊन जाणारा प्रवासी पोलिसांच्या ताब्यात - forest
उस्मानाबाद जिल्ह्यतल्या सालेगाव इथे राहाणारा संघर्ष राजेंद्र भालेराव याला गगनबावडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जिल्ह्यात नाकाबंदी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
याप्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यतल्या सालेगाव इथे राहाणारा संघर्ष राजेंद्र भालेराव याला गगनबावडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जिल्ह्यात नाकाबंदी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. गगनबावडा येथे नाकाबंदी दरम्यान थांबलेल्या पोलीस पथकाने पणजी ते महाबळेश्वर ही एस.टी. थांबविली. बसची तपासणी करीत असताना एक बॅग मिळून आली. बॅगेत एअरगन, दोन कुकरी, छर्यांचा डबी असे साहित्य मिळून आले. बॅगेबाबत चौकशी केली असता, ती संघर्ष भालेराव याची असल्याचे समजले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने ही हत्यारे कशासाठी? कोठून आणली? तो कोठे जात होता? याची चौकशी गगनबावडा पोलीस करीत आहेत.