कोल्हापूर - आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक सोमवारी शहरात झाली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्ष सुहास वारके आणि बेळगावचे पोलीस महानिरीक्षक राघवेन्द्र सुहास यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक काळात अवैद्य धंदे, दारू- हत्यारे तस्करी, हवाला ऑपरेटर यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या सक्त सूचना महानिरीक्षक वारके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
विधानसभा निवडणूक 2019 : अवैद्य धंदे, हवाला ऑपरेटर यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना सूचना : सुहास वारके - Assembly elections kolhapur 2019
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक सोमवारी शहरात झाली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्ष सुहास वारके आणि बेळगावचे पोलीस महानिरीक्षक राघवेन्द्र सुहास यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक काळात अवैद्य धंदे, दारू- हत्यारे तस्करी, हवाला ऑपरेटर यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या सक्त सूचना महानिरीक्षक वारके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक सोमवारी शहरात झाली.
हेही वाचा -जळगावात भाजपकडून स्वबळाची तयारी; सेनेच्या मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा
तसेच निवडणूक काळात गोव्याहून बनावट मद्य तसेच हवाला रक्कम तस्करीचा धोका अधिक आहे. हे लक्षात घेता जादा तपासणी नाके उभारून समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. बोगस मतदारांसह दहशत माजवणाऱ्या टोळ्या ही दोन्ही राज्याच्या पोलिसांच्या रडारवर असतील.