कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची सुरुवात होऊन रविवारी (दि. १६) एक वर्ष पूर्ण झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यासाठी सुरुवात झाली. कोल्हापुरातल्या कसबा बावडा येथील सेवा रुग्णालय येथे या लसीकरणाची सुरुवात झाली ( Kolhapur Covid Vaccination ) होती. त्यानंतर लाखो लोकांचे लसीकरण झाले आहे. या एक वर्षाच्या कालावधीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात नेमक्या किती नागरीकांचे लसीकरण झाले, कोणकोणत्या वयोगटात किती उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे आणि किती पूर्ण झाले यावरचा ( Covid Vaccination Status Kolhapur ) हा विशेष रिपोर्ट..
३० लाख नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ठ
कोल्हापूर जिल्ह्यात १८ वर्षांवरील एकूण ३० लाख १४ हजार ४०० नागरिकांचे लसीकरण करण्याचे प्रशासन उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी एकूण २८ लाख ३९ हजार ३९४ नागरिकांनी लसीचा पहिला डोस ( Covid Vaccination First Dose Kolhapur ) घेतला आहे. तर २० लाख ७१ हजार ९७४ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला ( Covid Vaccination Second Dose Kolhapur ) आहे. एकूण ३० लाख उद्दिष्टापैकी फ्रन्टलाइन वर्कर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे सुद्धा उद्दिष्टपेक्षा जादा लसीकरण झाले आहे. १८ ते ४४ वयोगटातील १३ लाख ९८ हजार ६४७ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर ९ लाख ६ हजार ५९९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ ते ६० वर्ष वयोगटातील ७ लाख ३६ हजार ५६६ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर ५ लाख ९० हजार ४९१ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ६० वर्षांवरील नागरिकांपैकी ५ लाख ४९ हजार ७६६ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर ४ लाख ३५ हजार २७७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण ३० लाख १४ हजार ४०० उद्दिष्टापैकी एकूण २८ लाख ३९ हजार ३९४ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. मोठ्या प्रमाणात दुसरा डोस सुद्धा घेण्याबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. शिवाय १५ ते १७ वयोगटातील मुलांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले ( Children Covid Vaccination Kolhapur ) आहे. प्रशासनाने या वयोगटातील जवळपास १ लाख ९९ हजार ८८८ इतक्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले होते.
बूस्टर डोसची सुरुवात
जिल्ह्यात १० जानेवारी २०२२ पासून बूस्टर डोस द्यायला सुरवात करण्यात आली आहे. त्यासाठी सुद्धा जिल्ह्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून, आत्तापर्यंत तब्बल ३५ हजार ३३१ जणांनी बूस्टर डोस घेतला ( Kolhapur Covid Vaccination Booster Dose ) आहे.