कोल्हापूर - कोल्हापुरात पावसाचा जोर अद्याप कायम आहे. सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापुरात पुन्हा एकदा महापुराची परिस्थिती उद्भवते की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे. तर, सदर परिस्थिती लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने एनडीआरएफची दोन पथके पुण्याहून रवाना झाली आहेत.
पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल; एनडीआरएफची दोन पथके पुण्याहून कोल्हापुरकडे रवाना
कोल्हापुरातील पावसाचा जोर पाहता पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरु झाली असून सुरक्षेच्या दृष्टीने एनडीआरएफची दोन पथके पुण्याहून रवाना झाली आहेत.
एनडीआरएफ
सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 33.1 फुटांवरून वाहत असून जिल्ह्यातील 53 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. याबाबत अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...
Last Updated : Sep 6, 2019, 10:49 PM IST