कोल्हापूर- कोल्हापुरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली असून कोरोनाची पहिली लस घेण्याचा मान आरोग्य कर्मचारी अक्षता माने यांना मिळाला आहे.नेमक्या वाढदिनी त्यांना लस मिळाल्याने सरकारकडून ही भेट असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत व आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या लसीकरणाला सुरुवात झाली. दिवसभरात जिल्ह्यात अकराशे जणांना ही लस देण्यात येणार आहे.
११ केंद्रावर १ हजार १०० जणांना देणार लस
जिल्ह्यात एकूण ११ लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. कोल्हापूर शहरात ६ तर ग्रामीण भागात ८ केंद्र आहेत. आज दिवसभरात अकराशे जणांना देणार लस देण्यात येणार आहे. ४२० कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नेमणूक करण्यात आली आहे.ना
गरिकांनी न घाबरता लस घेण्यास सहकार्य करावे - आमदार ऋतुराज पाटील
नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना लसीकरण घेण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले.
सरकारी-खासगी डॉक्टरांना मिळणार लस