कोल्हापूर : गायरानमधील अतिक्रमण (Encroachment in Gayran) काढण्याच्या निर्णय विरोधात आता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. गायरानमधील अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात अतिक्रमणधारकांच्या घरांवर आजपासून नोटीस बजावण्यात सुरुवात केली (Notice regarding removal of encroachment in Gayran) आहे. या नोटीसद्वारे अतिक्रमण धारकांना पंधरा दिवसात आपले अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यालाच विरोध करत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय महामोर्चा काढण्यात येणार आहे.
कॅव्हेट दाखल करण्यात येणार :दरम्यान जिल्ह्यातील एकूण 1025 ग्रामपंचायत मधील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज मंगळवारी कॅव्हेट दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळते. याबाबत जिल्हा व सत्र न्यायाधीशांची अधिकाऱ्यांनी चर्चा केल्याचे सुद्धा माहिती आहे. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले (grand march at collector office) आहे.