कोल्हापूर- जिल्ह्यात आज (दि. 29) एकही कोरोनाग्रस्त आढळला नसून एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. जिल्ह्यासाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. एकीकडे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा प्रशासन सतर्क झाले असून अनेक निर्बंध पुन्हा लागू होण्याची शक्यता आहे. अशातच कोल्हापुरात आता कोरोनाचे केवळ 30 रुग्ण उरले असून आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, आज नवीन एकही रुग्ण आढळला नसून 6 जणांना डिस्चार्ज मात्र देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 6 हजार 761 वर पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 935 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण मृतांची संख्या 5 हजार 796 झाली आहे तर सद्यस्थितीत केवळ 30 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
- 1 वर्षाखालील - 357 रुग्ण
- 1 ते 10 वर्ष - 7 हजार 611 रुग्ण
- 11 ते 20 वर्ष - 17 हजार 493 रुग्ण
- 21 ते 50 वर्ष - 1 लाख 18 हजार 778 रुग्ण
- 51 ते 70 वर्ष - 49 हजार 580 रुग्ण
- 71 वर्षांवरील - 12 हजार 942 रुग्ण