महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 26, 2021, 8:24 AM IST

ETV Bharat / state

Night Curfew in Kolhapur : मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू; 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, नवीन आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार
जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात काल रात्रीपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, नवीन आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.

काय आहेत नियम यावर एक नजर :

  • संपूर्ण जिल्ह्यात सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल.
  • लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल त्यास परवानगी असेल.
  • इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल त्यास परवानगी असेल.
  • वरील दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशा ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी 25 टक्के उपस्थितीस परवानगी असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या 25 टक्के पेक्षा जास्त उपस्थिती असता कामा नये.
  • क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थितीस परवानगी नसेल.
  • वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या संपूर्ण खुल्या असलेल्या जागांच्या बाबतीत, कोणत्याही समारंभांसाठी किंवा संमेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमता,औपचारिकपणे आधीच निश्चित केलेली नसेल तर संबंधित मनपा आयुक्त, मुख्याधिकारी किंवा तहसिलदार ही क्षमता निश्चित करतील.
  • उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 25 टक्के उपस्थितीस परवानगी राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच 500 टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.
  • या आदेशात विशेषतः नमूद केलेल्या निर्बंधाव्यतिरिक्त सर्व निर्बंध आदेशानुसार लागू राहतील. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details