कोल्हापूर- कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या नियमात बदल करून व्यापाऱ्यांना ७ ते ११ या वेळेतच दुकाने उघडी करण्याची परवानगी दिली. मात्र लक्ष्मीपुरी बाजारपेठेत अकरानंतर किराणा व भाजी मंडई दुकाने सुरू असल्याचे कळताच पोलिसांनी आणि महापालिकेच्या भरारी पथकाने बाजारपेठेत धडक मारली. यावेळी व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. महापालिका प्रशासनाने कारवाईचा इशारा देताच व्यापाऱ्यांनी पटापट दुकान बंद केली. तर काही व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली.
कोल्हापूर: बजारपेठेतील सकाळी ११ नंतर दुकाने उघडी! पोलीस येताच व्यापाऱ्यांची धावपळ - कोल्हापूर न्यूज मराठी
कोल्हापूरमधील लक्ष्मीपुरी बाजारपेठेत सकाळी अकरानंतर किराणा व भाजी मंडई दुकाने सुरू असल्याचे कळताच पोलिसांनी आणि महापालिकेच्या भरारी पथकाने बाजारपेठेत धडक मारली. यावेळी व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.
लक्ष्मीपुरी बजारपेठ