कोल्हापूर- गेल्या 6 दिवसांपासून कोल्हापुरात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज सकाळपासून आणखी आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 44 वर पोहोचली आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये पन्हाळ्यातील 26 वर्षांच्या तरुणाचा समावेश आहे. तसेच भुदरगड तालुक्यातील 27 वर्षांची महिला, गारगोटीमधील 8 वर्षांचा लहान मुलगा आणि शहरातील 28 वर्षांच्या तरुणाचा समावेश आहे.
कोल्हापुरात आणखी आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; एकूण संख्या 44 वर - kolhapur patient number
कोल्हापुरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज नवीन आठ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या नवीन रुग्णांसह जिल्ह्यातील बाधितांची संख्या 44 वर पोहोचली.
याच प्रमाणे अन्य चौघांमध्ये शहरातील 23 वर्षांची तरुणी, शाहुवाडीतील 22 वर्षांचा तरुण, आजरामधील 49 वर्षांचा पुरुष तर भुदरगड मधील 32 वर्षांच्या तरुणाचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण मुंबई आणि सोलापूरहून जिल्ह्यात दाखल झाले होते. या चौघांपैकी 3 जण 13 मे रोजी तर 1 रुग्ण 15 मे रोजी सीपीआर मध्ये दाखल झाला होता. आज सकाळी त्यांचे रिपार्ट पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण रुग्णांपैकी सीपीआर रुग्णालयातून आत्तापर्यंत 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकाचा मृत्यू झालाय.
गेल्या सहा दिवसांपासून कोल्हापुरात दररोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मोठ्या संख्येने पर जिल्ह्यात अडकून पडलेले लोक कोल्हापुरात परतत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.