महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नूतन मंत्र्यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत; पाहा काय म्हणाले मंत्री मुश्रीफ, सतेज पाटील - राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांचे कोल्हापुरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे ढोल-ताशांच्या गजरामध्ये आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

kolhapur
नूतन मंत्र्यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत

By

Published : Jan 3, 2020, 12:24 PM IST

Updated : Jan 3, 2020, 12:32 PM IST

कोल्हापूर -महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळाल्यानंतर नूतन कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे पहिल्यांदाच कोल्हापुरात आगमन झाले. यावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतावेळी संपूर्ण रस्ता गजबजून गेला होता. कोल्हापूर भाजपमुक्त झाले असून त्याचा आनंद महाविकास आघाडीच्या माध्यमातून सगळी जनता साजरा करत असल्याचे राज्यमंत्री पाटील यावेळी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.

नूतन मंत्र्यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत

महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांचे कोल्हापुरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे ढोल-ताशांच्या गजरामध्ये आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोल्हापुरातील ताराराणी चौकमध्ये या तीनही मंत्र्यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Last Updated : Jan 3, 2020, 12:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details