कोल्हापूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले आपल्या विधानावर कधीही ठाम राहत नाही. हवामान बदललं की त्यांची वक्तव्य बदलतात अशा शब्दांत भाजप प्रवक्ते आशिष शेलार यांनी पटोलेंवर टीका केली आहे. जे स्वतःच्या विधानावर ठाम राहू शकत नाहीत त्यांची केस काय टिकणार असे म्हणत त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पटोले यांच्याबाबद्दल बोलले ते खरे आहे असेही ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
इन्कम टॅक्स आणि ईडी गुन्हेगारांच्या मागे लागली आहे
जरंडेश्वर कारखाना आणि ईडीबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले, इन्कम टॅक्स आणि ईडी कुणाच्याही मागे लागली नाही, तर गुन्हेगारांच्या मागे लागली आहे. कर नाही त्याला डर कशाला पाहिजे असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. शिवाय नुकतीच केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केली आहे, याबाबत राज्यातील काही नेते चुकीचा प्रचार करत आहेत. त्यांच्या पोटात का दुखत आहे? काहीच सुरू झाले नसतानाही हे चुकीचा प्रचार का करत आहेत असेही शेलार म्हणाले.
हवामान बदललं की नाना पाटोलेंची वक्तव्ये बदलतात - आशिष शेलार - bjp
हवामान बदललं की नाना पटोलेंची वक्तव्ये बदलतात अशा शब्दांत भाजप प्रवक्ते आशिष शेलार यांनी पटोलेंवर टीका केली आहे. जे स्वतःच्या विधानावर ठाम राहू शकत नाहीत त्यांची केस काय टिकणार असे म्हणत त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असेही ते म्हणाले.
येणाऱ्या निवडणुकात यांना पंढरपूरच दाखविणार
यावेळी शिवसेनेच्या पक्ष विस्ताराबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले, हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. कोणीही पक्ष विस्तारासाठी काहीही करावे किंव्हा स्वबळावर लढण्याबाबत बोलावे. पण यापुढे ज्या निवडणुका येतील त्या सर्व निवडणुकामध्ये यांना पंढरपूरच दाखविणार आहे असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला.
स्वप्नीलच्या आत्महत्येबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवली नाही
एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने केलेल्या आत्महत्येवर बोलताना शेलार पुढे म्हणाले, आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना वारंवार स्वप्नीलच्या कुटुंबियांना मदत करण्याबाबत विनंती केली आहे. सभागृहातसुद्धा याबाबत मागणी केली. शिवाय त्याच्या कुटुंबावर असलेले कर्ज तरी माफ करावे याबाबत बोललो आहे. मात्र सरकारने संवेदनशीलता दाखवली नाही अशीही टीका शेलार यांनी यावेळी केली.
हेही वाचा -महाविकास आघाडी मजबूत आणि स्थिर, नाना पटोलेंनंतर बाळासाहेब थोरातांचे स्पष्टीकरण