कोल्हापूर - तांबडा अन पांढरा रस्सा म्हटल की, कोल्हापूरची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मात्र, कोल्हापुरातील मटन आणि चिकनची खरेदी-विक्री पुढील पाच दिवस बंद राहणार असल्याचा अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी आदेश काढल्याने एक नवा वाद समोर आला आहे. २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत हा निर्णय लागू केला आहे.
तांबडा अन पांढरा रस्सासाठी पसिद्ध कोल्हापुरात पाच दिवस मटन-चिकन बंद; सकल मराठा समाजाकडून आंदोलनाचा ईशारा हेही वाचा - कोल्हापूरच्या कडकनाथ घोटाळा प्रकरणी संचालकांवर गुन्हा दाखल
हा आदेश अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या मागणीनुसार जारी करण्यात आल्याचा आरोप सकल मराठा समाजाकडून करण्यात आला आहे. या निर्णयाला आमचा विरोध असून अशा प्रकारचे आदेश आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करत असाल तर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा ईशाराही सकल मराठा समाजाकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा - कडकनाथ घोटाळा : जास्त पैसे देण्याचे अमिष दाखवून शेतकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा
भारतीय जैन धर्मियांचा महत्त्वाचा सण म्हणजे पर्युषन महापर्व काळ, या सणात हिंसा होऊ नये, तसेच हा सण त्यागाचे प्रतीक म्हणून करून साजरा केला जातो. त्यामुळे या काळात हिंसा होऊ नये म्हणून जैन समाजाच्यावतीने निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेऊन अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी तात्काळ कत्तलखाने पाच दिवस बंद करण्याचे आदेश दिले. अशा प्रकारचे आदेश देऊन आमच्यावर अन्याय होत असेल तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सकल मराठा समाजाकडून देण्यात आला आहे.