महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kolhapur Murder Case : प्रेमात अडसर ठरणाऱ्या तरुणाचा खून; 3 तासांतच पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा - तिचा पाठलाग करायचा

प्रेमात अडसर ठरणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाचा खून ( murder of young man ) करण्यात आल्याची घटना कोल्हापूरात घडली आहे. प्रियसीला वारंवार त्रास देण्याच्या कारणावरून प्रियकराने रागाच्या भरात तिघा मित्रांच्या मदतीने मिळून चाकूने भोकसून या तरुणाचा खून केला (killed with the help of three friends ) आहे.

murder of young man
murder of young man

By

Published : Jun 27, 2022, 10:45 AM IST

कोल्हापूर : प्रेमात अडसर ठरणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाचा खून ( murder of young man ) करण्यात आल्याची घटना कोल्हापूरात घडली आहे. प्रियसीला वारंवार त्रास देण्याच्या कारणावरून प्रियकराने रागाच्या भरात तिघा मित्रांच्या मदतीने मिळून चाकूने भोकसून या तरुणाचा खून केला (killed with the help of three friends ) आहे. कोल्हापूरातील साळोखेनगर परिसरात कोपार्डेकर हायस्कूलसमोर असलेल्या माळावर ही घटना घडली.

संकेत सर्जेराव पाटील (रा. शिवगंगा कोलनी, साळोखेनगर) असे या मृत तरुणाचे नाव आहे. तर शिवराज चंद्रकांत बंडगर (वय 22), रोहित नामदेव कांबळे (वय 19) आणि प्रतीक विजय कांबळे असे अटक केलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी घटनेचा तपास केला असता काही तासांतच परिस्थीती त्यांच्या लक्षात आली आणि पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा -Live Maharashtra Political crisis : शिंदे गटाची आज सकाळी १० वाजता गुवाहाटीत होणार बैठक, काय ठरणार?

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, संकेत हा प्रतीकच्या प्रेयसीच्या मागे लागला होता. त्यामुळे तो तिचा पाठलाग करायचा ( He Followed His Beloved ) . हाच राग मनात धरून रागाच्या भरात प्रतीकने संकेतला जिवे मारण्याचा डाव आखला. खरंतर संकेत हा गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरातील अध्यमनगर परिसरात नोकरी करत होता. तो इथेच साळोखेनगर परिसरातील शिवगंगा कॉलनीमध्ये चुलते दिलीप पाटील यांच्याकडे राहत होता. चुलते माजी सैनिक असून मध्यवर्ती बसस्थानक येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करत आहेत. रात्री उशिरा संकेत जेवून घराबाहेर पडला. तेंव्हा त्याला संशयित तिघांनी कोपार्डेकर हायस्कूल शाळेच्या समोरच असलेल्या माळावर बोलावून घेतले. आणि काही समजण्याच्या आतच चाकूने वार करून निर्घृणपणे हत्या केली. जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी नागरिक आले तेव्हा याठिकाणी त्यांना मृतदेह आढळला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास केला असता अवघ्या काही तासांत त्यांनी याचा छडा लावत तिघांना अटक केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा -Shivsenas rebel of MLAs petition : एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेनेची लढाई सर्वोच्च न्यायालयात, दोन दिग्गज वकील मांडणार बाजू


ABOUT THE AUTHOR

...view details