कोल्हापूर- जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. सोमवारी (दि. 5एप्रिल) दिवसभरात 111 नवे रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 79 जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे. पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे. शिवाय आरोग्य यंत्रणाही कामाला लागली आहे. सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 114 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 52 हजार 754 इतकी झाली आहे. 1 एप्रिल ते 5 एप्रिल या 5 दिवसात तब्बल 572 रुग्ण वाढले आहेत तर 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 52 हजार 754 वर पोहोचली आहे. त्यातील 49 हजार 852 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी, 2021 ला जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 114 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 1 हजार 788 झाली आहे. नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे
1 वर्षाखालील - 61 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 1 हजार 956 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 3 हजार 682 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 28 हजार 37 रुग्ण
51 ते 70 वर्ष -15 हजार 158 रुग्ण
71 वर्षांवरील - 3 हजार 860 रुग्ण
तालुक्यानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे
आजरा - 931
भुदरगड - 1 हजार 283
चंदगड - 1 हजार 237
गडहिंग्लज - 1 हजार 578
गगनबावडा - 156