महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील वाढदिवशी राबवणार 'हा' उपक्रम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील 1 हजार डॉक्टरांना पीपीई किटचे सुद्धा वाटप करण्यात आले होते. याबाबत स्वतः अभिनेता सलमान खान याने ट्वीट करत आमदार ऋतुराज पाटील यांचे कौतुक केले होते.

MLA Rituraj Patil
कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील

By

Published : May 30, 2020, 4:25 PM IST

कोल्हापूर - लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारी 31 मे रोजी होणारा माझा वाढदिवस मी साजरा करणार नाही. वाढदिवसाच्या निमित्ताने कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ तसेच कसबा बावडा येथील घरोघरी रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या 1 लाख होमिओपॅथिक औषध बाटल्या आणि 10 हजार ‘सॅनिटायझर स्प्रे’चे वाटप करणार आहे, अशी माहिती कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. शिवाय याच पार्श्वभूमीवर रक्तदान करू इच्छिणाऱ्या तरुण पिढीसाठी गुगल फॉर्मच्या माध्यमातून रक्तदात्यांची डिरेक्टरी तयार करण्यात येणार असल्याचे ही ते म्हणाले.

मागील 2 महिन्यांपासून डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून अनेक गरजूंना वेगवेगळ्या मार्गाने मदतीचा हात देण्यात आला आहे. शिवाय एप्रिल महिन्यात सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील 1 हजार डॉक्टरांना पीपीई किटचे सुद्धा वाटप करण्यात आले होते. याबाबत स्वतः अभिनेता सलमान खान याने ट्वीट करत आमदार ऋतुराज पाटील यांचे कौतुक केले होते. समाजातील अनेकजण अशाप्रकारे कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आपआपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. शिवाय वाढदिवससुद्धा कोरोनाच्या या संकटकाळात असल्याने हा साजरा न करता जवळपास 1 लाख नागरिकांना औषधांचे वाटप तर 10 हजार 'सॅनिटायझर स्प्रे'च्या बाटल्या देण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वत: ची रोगप्रतिकार शक्ती वाढविणे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ही गोष्ट लक्षात घेऊनच कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ आणि कसबा बावडा येथे रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या ‘आर्सेनिक एल्बम-30 C’ या भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने मान्यता दिलेल्या होमिओपॅथिक औषधाचे वाटप करण्यात येणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details